PM Surya Ghar Scheme : घरावरील सोलर पॅनलने होईल वीजनिर्मिती, नेमका काय फायदा होईल, संपूर्ण माहिती

Free Electricity: घरावरील सोलर पॅनलने होईल वीजनिर्मिती, नेमका काय फायदा होईल, संपूर्ण माहिती
PM Surya Ghar Scheme : घरावरील सोलर पॅनलने होईल वीजनिर्मिती, नेमका काय फायदा होईल, संपूर्ण माहिती
PM Surya Ghar Scheme : घरावरील सोलर पॅनलने होईल वीजनिर्मिती, नेमका काय फायदा होईल, संपूर्ण माहिती

PM Surya Ghar Scheme: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना केंद्र सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे. याचा उद्देश सौर ऊर्जेला प्राधान्य देणे आणि सर्वसामान्यांना कमी खर्चिक वीज उपलब्ध करुन देणे हा आहे. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी सबसिडी व बँकेद्वारे कर्ज दिले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली’ म्हणजेच ‘पीएम सूर्य घर मोफत वीज’ योजना १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात आली. ही योजना घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्याशी निगडीत आहे. ह्या योजनेद्वारे देशातील १ कोटी लोकांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून मोफत वीज सुविधेचा लाभ दिला जाईल. ह्या योजनेमुळे हरित ऊर्जेला प्राधान्य देऊन पर्यावरणाचे जतन करण्याची मोहिम सरकारने हाती घेतली आहे. त्यामुळे ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवुण जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जात आहे.

PM Surya Ghar Scheme पीएम सूर्य घर मोफत वीज योजना काय आहे?

१ फेब्रुवारी २०२४ ला अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा केली होती. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची अधिकृत घोषणा करत १५ फेब्रुवारीपासून याची सुरुवात करण्यात आली. १ कोटी घरांना मोफत वीज देण्याचा योजनेचा उद्देश आहे. घराच्या छतावर सौर पॅनल बसवणाऱ्या लोकांना मोफत वीज मिळणार आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला ३०० युनिट मोफत वीज दिली जाणार.

किती प्रमाणात बचत केली जाऊ शकते?

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेमुळे वार्षिक किमान १५ हजारांची बचत करण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीजेचा खप होणाऱ्या कुटुंबास ३ किलोवॅट क्षमतेची रुफ टॉप सोलर युनिट लावावी लागणार. यामुळे एक कुटुंब १८०० रुपये ते १८७५ रुपयांची मासिक वीजेची बचत करु शकते.यामुळे घरमालक आपली अतिरिक्त वीज विकून पैसे कमवू शकतील.

PM Surya Ghar Scheme सबसिडीवर मर्यादा


या योजने अंतर्गत २ किलोवॅट रूफटॉप सोलर प्लांटसाठी बेंचमार्क खर्चानुसार ६० टक्के सबसिडी मिळेल.अनुदानावर ३ किलोवॅट ची मर्यादा असणार आहे. सध्याच्या दरानुसार, १ किलोवॅट प्रणालीवर ३०,००० रुपये , २ किलोवॅट प्रणालीवर ६०,००० रुपये तर ३ किलोवॅट प्रणालीवर ७८,००० किंवा त्याहून अधिक अनुदान उपलब्ध करून दिले.

PM Surya Ghar Scheme : घरावरील सोलर पॅनलने होईल वीजनिर्मिती, नेमका काय फायदा होईल, संपूर्ण माहिती
PM Surya Ghar Scheme : घरावरील सोलर पॅनलने होईल वीजनिर्मिती, नेमका काय फायदा होईल, संपूर्ण माहिती
पीएम सूर्य घर योजनेची पात्रता
  • अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  • अर्जदाराचे स्वतःचे घर तसेच छतावर सौर पॅनेल लावण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.
  • घरात वीजेचे वैध कनेक्शन असणे गरजेचे आहे.
  • वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे.
पीएम सूर्य घर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  • ओळखीचा पुरावा
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • वीज बील
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

Join our WhatsApp GroupTelegram, and facebook page