Sugarcane Production : क्रांती अग्रणी पॅटर्न मधून २० शेतकऱ्यांना एकरी १०० टनांपेक्षा अधिक उत्पादन
Sugarcane Krantiagrani Pattern : सांगली येथील क्रांती अग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना पथदर्शक प्रकल्पातून अधिकाधिक ऊस उत्पादन वाढीसाठी प्रोस्ताहीत केले.
Sangli News: सांगली येथील क्रांति अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना पथदर्शक प्रकल्पातून अधिकाधिक ऊस उत्पादन वाढीसाठी प्रोस्ताहित केले.
त्यामुळे सुमारे २० हुन अधिक शेतकऱ्यांनी एकरी शंभर टनांपेक्षा अधिक उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी एकरी शंभर टनांपेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी पुढे येत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यानी सांगितले.
कारखान्याच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवत आहेत. कारखान्याकडून पुरवलेले तंत्रज्ञान, योग्य सल्ला आणि चिकाटीच्या जोरावर शेतकरी योग्य नियोजन करत आहेत. क्रांती अग्रणी च्या पायलट योजनेतून शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे येत आहेत.
ऊस विकास विभागाकडून शेतकरी मार्गदर्शन घेत असून नांगरट, रोटर अशी पूर्व मशागत करून, माती परीक्षण करण्यास प्रधान्य दिले जाते. जमिनीची सोपीकता वाढवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर केला जातो.
यंदाच्या हंगामात कारखान्याकडे आजवर गाळपासाठी आलेल्यापैकी विजय जाधव (आसद, १२९ टन), विद्युलता देशमुख (शिरगाव, ११८ टन), आत्माराम शिंदे (देवराष्ट्रे, १२३ टन), अशोक पाटील(राजापूर, १२२ टन), जयप्रकाश साळुंखे (दुधोंडी, ११९ टन), अरुणा लाड (कुंडल, ११५ टन), शांताराम जमदाडे (कुंभारगाव, १०० टन), केरू लाड (कुंडल, १०५ टन), हणमंत लाड (कुंडल, १०७ टन), अनिल लाड (कुंडल, १०२ टन), श्रीमंत लाड (कुंडल, १०० टन),
विष्णू पाटील (ढवळी, १०० टन), विशाल लाड (कुंडल, १०५ टन), तानाजी लाड (कुंडल, ११३ टन), लालासाहेब शिंदे(कुंडल, १०० टन), शिवाजी जाधव (कुंडल, १०० टन), अनिल पाटील (बांबवडे, १२५ टन), बाळकृष्ण पवार (बांबवडे, १०९ टन), जगन्नाथ पाटील (चिखलगोठण,१ ०७ टन), दत्तात्रय माने(१०७ टन), अक्षय कारंडे (आळसंद, १२३ टन), प्रकाश चव्हाण (तांदळगाव, १०४ टन) अशा अनेक शेतकऱ्यांनी १०० टनांवर उत्पादन घेतले.
“कायम उसाचे सरासरी एकरी ७५ ते ८० टन उत्पादन घेतो. क्रांती अग्रणी कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या पायलेट योजनेतून एकरी शाश्वत १०० टन या उपक्रमात भाग घेतला. पहिल्याच प्रयत्नात उच्चांकी यश मिळवले” . उदय लाड
“कारखाना कार्यक्षेत्रात उसाच्या उत्पादन वाढीसाठी पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एकत्रित प्रयत्नातून सरासरी उत्पादन ६० टनांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे”. शरद लाड, अध्यक्ष क्रांती अग्रणी साखर कारखाना
1 thought on “Sugarcane Production”