MI vs RR : रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकसह ‘या’ यादीत पोहोचला पहिल्या स्थानावर

MI vs RR : आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत दिनेश कार्तिकसह रोहित शर्मा शीर्षस्थानी पोहोचला आहे. आतापर्यंत रोहित शर्मा १७ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

MI vs RR : रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकसह ‘या’ यादीत पोहोचला पहिल्या स्थानावर
MI vs RR : रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकसह ‘या’ यादीत पोहोचला पहिल्या स्थानावर

संघ वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने आले होते. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबई इंडियन्सचे टॉप-३ फलंदाज एकही धाव न काढता माघारी परतले. रोहित शर्माशिवाय नमन धीर आणि देवाल्ड ब्रेविस यांना खाते उघडण्यात अपयश आले. त्याचवेळी रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

MI vs RR  रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद –

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दिनेश कार्तिकसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. आतापर्यंत, रोहित शर्माशिवाय, दिनेश कार्तिक आयपीएलच्या इतिहासात १७ वेळा शून्यावर बाद झाला आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आहे. आतापर्यंत ग्लेन मॅक्सवेल विक्रमी १५ वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे.

सर्वाधिक शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंची यादी –

यानंतर पियुष चावला चौथ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत पीयूष चावला १५ वेळा आयपीएल सामन्यांमध्ये एकही धाव न काढता बाद झाला आहे. याशिवाय मनदीप सिंग आणि सुनील नरेनही प्रत्येकी १५ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त रोहित शर्मा आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सचा भाग होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु व्यतिरिक्त, दिनेश कार्तिक मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे.

  MI vs RR आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज –

रोहित शर्मा – १७*
दिनेश कार्तिक – १७
पियुष चावला- १५
मनदीप सिंग – १५
सुनील नरेन- १५
ग्लेन मॅक्सवेल- १५

सामन्याबद्दल बोलायचे तर, मुंबई इंडियन्स संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध घरच्या मैदानावर केवळ १२५ धावा करू शकला. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर नांद्रे बर्गरला दोन यश मिळाले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस शून्यावर बाद झाले. इशान किशन १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर हार्दिक पंड्याने २१ चेंडूत ३४ धावा आणि तिलक वर्माने २९ चेंडूत ३२ धावा केल्या, मात्र कर्णधार आऊट होताच फलंदाज प्रत्येकी एका धावेसाठी झगडताना दिसले.

Join our WhatsApp GroupTelegram, and facebook page

Leave a comment