Ladka Bhau Yojana : लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कुठे करावा? पात्रता अन् निकष काय? कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या सविस्तर!

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेनंतर राज्यात लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेउया.

Ladka Bhau Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याकरता अनेक अडचणी येत असल्या तरीही या अडचणी दूर करून महिलांच्या आर्थिक उन्नतीकरता मोठ्या प्रमाणात अर्ज भरून घेतले जात आहेत. दरम्यान, राज्यातील महिलांची आर्थिक अडचण दूर करताना राज्यातील बेरोजगार तरुणांसाठीही सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली आहे. याच योजनेला माझा लाडका भाऊ योजना असं संबोधलं जात आहे.

Ladka Bhau Yojana or Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादषीनिमित्त उद्या (१७ जुलै) पहाटे पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा करणार आहेत. या पूजेसाठी ते आज संध्याकाळीच पंढरपुरात दाखल झाले. दरम्यान, संध्याकाळी त्यांनी पंढरपुरात आयोजित ‘कृषी पंढरी’ या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. दरम्यान, शिंदे यांनी पंढरपुरातून लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेंतर्गत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्याची घोषणा केली.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्र्यांबरोबर यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी तरुणांसाठीच्या योजनेची घोषणा केली.

 

Leave a comment