Free Silai Machine Yojana 2024 Online Form Maharashtra
Free Silai Machine Yojana Maharashtra : नमस्कार मित्रानो आज आपण PM फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र संबंधित संपूर्ण माहिती आज या लेख मध्ये पाहणार आहेत. त्यामध्ये या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, या योजनेसंबंधी चा ऑनलाईन फार्म, ऑनलाईन अप्लिकेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्जाची प्रक्रिया, टोल फ्री नंबर इत्यादी सर्व गोष्टीची माहिती आज आपण या लेख मध्ये समजून घेणार आहेत.
Free Silai Machine Yojana Online Form Maharashtra 2024
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या या फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ आपल्या देशात शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मिळणार आहे. प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यात ५० हजाराहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्यामुळे महिला घरी बसून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. या योजनेअंतर्गत २० ते ४० वयोगटातील महिला अर्ज करू शकतात आणि या योजनेअंतर्गत फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना रोजगार देण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना २०२२ ला चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि मेहनती महिलांना केंद्र सरकार कडून फ्री शिलाई मशीन देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला घरी बसून स्वतः चा रोजगार सुरु करू शकतील आणि त्यातून चांगले नफा मिळवू शकतील.
Free Silai Machine Yojana Maharashtra 2024 उद्दिष्ट काय?
मोफत शिलाई मशीन योजना २०२२ ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चालू केलेली आहे. जेणेकरून देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना फ्री शिलाई मशीन उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे देशातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होतील आणि त्या घरबसल्या शिवणकाम करून स्वतः चा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार पेलू शकतील. या योजनेच्या माध्यमातून शिवणकाम येत असलेल्या कामगार महिला स्वालंबी आणि सक्षम बनतील. तसेच त्यांच्या आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा करणे ये या योजनेचे मुख्य स्वरूप आहे. या योजनेचा लाभ देशातील बऱ्यापैकी राज्यामधील महिला घेऊ शकतील.
Free Silai Machine Yojana Maharashtra Highlights
योजनेचं नाव फ्री शिलाई मशीन योजना
आरंभ केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
वर्ष 2024
लाभार्थी ग्रामीण भागातील महिला
उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवणे आणि उत्पन्नच्या संधी उपलब्ध करून देणे
श्रेणी केंद्र सरकारच्या योजना
अधिकृत www.india.gov.in
मोफत शिलाई मशीन साठी आवश्यक पात्रता काय?
१} या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय २० ते ४० वर्ष असणे गरजेचं आहे.
२} अर्जदार महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न [ तहसीलदार उत्पन्न दाखल्या नुसार ] १२०००/ रु पेक्ष्या जास्त नसावे
३} देशातील अपंग आणि विधवा महिला देखील या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंब आणि सक्षम बनवू शकतात.
मोफत शिलाई मशीन योजनेमध्ये कोणती राज्ये सामाविष्ट आहेत?
हि योजना केवळ काही राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे, काही काळानंतर हि योजना संपूर्ण देशात लागू केली जाईल. हि योजना लागू झालेली राज्ये यादी खालीलप्रमाणे आहेत.
१} हरियाणा
२} गुजरात
३} महाराष्ट्र
४} उत्तर प्रदेश
५} कर्नाटक
६} राज्यस्थान
७} मध्यप्रदेश
८} बिहार
९} छत्तीसगड
मोफत शिलाई मशिन योजना साठी कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड.
वय प्रमाणपत्र.
उत्पन्न प्रमाणपत्र.
ओळखपत्र.
अपंग असल्यास अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र.
महिला विधवा असल्यास तिचे निरीक्षक विधवा प्रमाणपत्र.
समुदाय प्रमाणपत्र.
पासपोर्ट आकाराचा फोटो.
मोबाईल नंबर.
मोफत शिलाई मशीन योजना अर्ज कसा करावा?
- या योजनेअंतर्गत, इच्छुक महिलांना अर्ज करायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल .
- तर वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल यानं
- वेबसाईट च्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला अर्ज मिळवावा लागेल
- Application Form – फ्री शिलाई मशीन योजना अर्ज येथे क्लिक करा
- अर्ज मिळवल्यानंतर, तुम्हाला अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती जसे कि नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड इत्यादी भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जासोबत एक फोटो जोडावा लागेल.
- या योजनेसाठी चा फॉर्म हा तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यलयामध्ये जसे कि ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, किंवा जिल्हा कार्यालय अशा सरकारी कार्यालया मध्ये तुम्ही हा फॉर्म जमा करू शकता
- त्यानंतर, कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. पडताळणी झाल्यानंतर, तुम्हाला मोफत शिवण मशीन दिली जाईल
योजनेच्या अधिक माहिती साठी पत्ता
टेक्निकल टीम
नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर
A4B4, तिसरा मजला, A ब्लॉक
CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड
नवी दिल्ली-110003
At. Kamkheda beed
pallavigore310@gmail.com At.