अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना- कोण लाभ घेऊ शकतात ? | पहा संपूर्ण माहिती

Annabhau Sathe Vikas mahamandal Loan Scheme : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना ( LASDC thet karj ), तरुणांना व्यवसायासाठी १ लाख कर्ज. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मातंग सामाजाला सक्षम करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाकडून समाजातील नागरिकांना उद्योग उभारण्यासाठी थेटकर्ज योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना

Annabhau Sathe Vikas mahamandal Loan Scheme

राज्यात मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील दारिरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविली जाते.

अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना – Annabhau Sathe Karj Yojana

1. मुदत कर्ज योजना (TERM LOAN)

अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना(LASDC Loan schemes) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजना सदर योजनेअंतर्गत विविध व्यवसायाकरिता NSFDC. मार्फत रु. ५ लाखांपर्यंत गुंतवणूक असलेल्या व्यवसायांच्या योजनांना मुदत कर्ज दिले जाते. कर्ज फेडीची मुदत NSFDC. ठरवेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत असेल. NSFDC. च्या कर्ज रकमेवरील व्याजाचा दर ६% व महामंडळाच्या कर्ज रकमेवरील व्याजाचा दर ४% असेल. महामंडळाच्या कर्ज रकमेची परतफेड NSFDC. च्या कर्ज रकमेच्या परतफेडीसह करावयाची आहे.

 

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील ‘या’ 11 जिल्ह्यांना जोडणारा एक नवीन महामार्ग तयार होणार !

 

2. लघुऋण वित्त योजना (MCF)

NSFDC. योजनेअंतर्गत लघुऋण वित्त योजना सन २०००-०१ पासून राबविण्यात येते. सादर योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी NSFDC. चे मुदत कर्ज रु. ४०,००० व अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अनुदान रु. १०,००० असे एकूण रु. ५०,००० च्या मर्यादेत लघु उद्योगांमध्ये लाभ देण्यात येतो. यामध्ये ५०% शहरी व ५०% ग्रामीण भागातील लाभार्थीना दर साल दर शेकडा ५% व्याज दराने लाभ दिला जातो.

3. महिला समृद्धी योजना (MSY)

ही योजना सन २००४-०५ पासून महामंडळामार्फत राबवण्यात येत आहे. सदर योजना NSFDC. कडून प्राप्त होणाऱ्या निधीतून राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी NSFDC. मुदत कर्ज रु. ४०,००० व महामंडळाचे अनुदान रु. १०,००० असे एकूण ५०,००० च्या मर्यादेत लाभ देण्यात येतो. सदर योजना ही फक्त महिला लाभार्थींच्या आर्थिक विकासासाठी राबविण्यात येते. यामध्ये प्राधान्याने परितक्त्या, विधवा व निराधार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. (यामध्ये ५०% शहरी व ५०% ग्रामीण भागातील महिलांना दर साल दर शेकडा ४% व्याज दराने लाभ देण्यात येतो) NSFDC. योजनेअंतर्गत उत्पन्न मर्यादा शहरी रु. १,०३,००० व ग्रामीण रु. ८१,००० शासन निर्णय क्र. मकवा – २०१३/ प्र. क्र. १४९ महामंडळ दि. १४ मे २०१२ नुसार महामंडळाच्या अर्थसहाय्यासाठी लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येत आहे.

4. महिला किसान योजना (MKY)

NSFDC., दिल्ली ह्यांच्या सहकार्याने फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी सदर योजना राबविण्यात येते. या योजनेतील मुख्य अट अर्जदाराच्या अथवा कुटुंबातील सदस्याच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. योजनेची प्रकल्प मर्यादा रु. ५०,००० असून NSFDC. चा सहभाग रु. ४०,००० तर त्यांचा व्याजदर ५% आहे व महामंडळाचे अनुदान रु. १०,००० आहे.

5. बीज भांडवल योजना (Margin Money)

या बीज भांडवल योजना अंतर्गत कर्ज मर्यादा ही 50 हजार रुपये ते 7 लाख रुपये पर्यंत आहे. या कर्ज मंजूर रकमेत 10 हजार रुपये वगळण्यात येईल व बाकीची रकमेत अर्जदाराला 5 % हिस्सा भरायला लागेल. आणि महामंडळ 20% हिस्सा आणि उर्वरित 75% हे बँकेचे कर्ज असेल. या योजने अंतर्गत दरवर्षी दसादशे 4% व्याज द्यावे लागेल.

अण्णा भाऊ साठे कर्ज योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतात ? – Annabhau Sathe Karj Yojana

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (Lokshahir Anna Bhau Sathe Dev.Co.Ltd) अंतर्गत अण्णा भाऊ साठे कर्ज योजना अंतर्गत मातंग समाजात समाविष्ट असणाऱ्या खालील १२ जाती आणि पोट जातींना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे

  1. मातंग
  2. मांग
  3. मिनी-मादींग
  4. दानखणी मांग
  5. मादींग
  6. मदारी
  7. मांग महाशी
  8. मांग गारुडी
  9. राधे मांग
  10. मांग गारुडी
  11. मादगी
  12. मादिगा

अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनांमधून लाभ मिळण्यास आवश्यक बाबी- Annabhau Sathe Karj Yojana

  1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे व ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  3. अर्जदार हा मातंग समाजाच्या १२ पोट जातीतील असावा.
  4. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान व अनुभव त्याच्याकडे असावा.
  5. केंद्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,००० पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,२०,००० पेक्षा कमी असावे.
  6. राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,००० पेक्षा कमी असावे.
  7. अर्जदाराने या महामंडळाकडून व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  8. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना आवश्यक कागदपत्र – Annabhau Sathe Karj Yojana

  1. अर्जदाराचा जातीचा दाखला. (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा.)
  2. अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पनाचा दाखला. (तहसीलदार ह्यांच्याकडून घेतलेला असावा.)
  3. अ) नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या २ प्रति जोडाव्यात.
    ब) राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबत नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या ३ प्रति जोडाव्यात.
  4. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला.
  5. रेशन कार्ड झेरॉक्स प्रती/ आधार कार्ड झेरॉक्स प्रती/ मोबाईल नंबर.
  6. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा.
  7.  ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा.
  8. एन. एस. एफ. डी. सी. योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हींग लायसन्स व आर. टी. ओ. कडील प्रवासी वाहतूक परवाना इत्यादी.
  9. वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंगबद्दल / किंमतीबद्दल अधिकृत विक्रेता/ कंपनीकडील दरपत्रक.
  10. व्यवसायसंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.
  11. व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल / खरेदी करावयाच्या मालाचे, साहित्याचे कोटेशन.
  12.  प्रतिज्ञापत्र (स्टॅम्प पेपरवर)

अर्ज प्राप्त झाल्यावर महामंडळामार्फत करावयाची कार्यवाही – Annabhau Sathe Karj Yojana

महामंडळाच्या सर्व जिल्हास्तरीय कार्यालयात लाभार्थींकडून प्राप्त झालेल्या विविध योजनांची सर्व कर्ज प्रकरणे, शासन निर्णय. क्र. मकवा २०१२/ प्र. क्र. १४९/ महामंडळे/ २०१२ दि. १४ मे २०१२ अन्वये, गठीत केलेल्या लाभार्थी निवड समिती समोर ठेवण्यात येतात. समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावास कर्ज मंजुरीसाठी महामंडळामार्फत शिफारस केली जाते. कर्ज मंजुरीची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. –

POCRA Scheme : ‘कृषी संजीवनी’ अंतर्गत साडेचार हजार लाभार्थ्यांना अनुदान..

 

१. जिल्हा कार्यालयात विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना व बीज भांडवल योजनेखाली अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक यांनी अर्जासोबत जोडलेल्या संपूर्ण कागदपत्रांची छाननी करून व आवश्यक त्या प्रकरणात प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवालासह स्थानिक सेवाक्षेत्रात येणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेस मंजुरीसाठी शिफारस करतात.

२. जिल्हा कार्यालयात एन. एस. एफ. डी. सी. योजनेअंतर्गत अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक रीतसर त्या प्रकरणाची नोंद करून कागदपत्रांची छाननी करून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून स्पष्ट अभिप्रायासह प्रादेशिक कार्यालयाकडे तो अर्ज पुढील कार्यवाहीसाठी शिफारस करतात.

३. प्रादेशिक कार्यालयामार्फत जिल्हावार कर्ज प्रकरणांची जेष्ठतेनुसार नोंद करून अर्जासोबत पाठविण्यात आलेल्या कागदपत्रांची शहानिशा करण्यात येते व कर्ज प्रकरणांची मुख्य कार्यालयाकडे शिफारस करण्यात येते.

४. मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या व्यवसायनिहाय उद्दिष्टांप्रमाणे प्रादेशिक व्यवस्थापक योग्य त्या शिफारशींसह जिल्हावार जेष्ठतेनुसार कर्जप्रकरणे मंजुरीसाठी मुख्यालयास शिफारस करतात.

५. मुख्यालयात संबंधित शाखेत प्रादेशिक कार्यालयाकडून व्यवसायनिहाय आलेल्या कर्ज प्रकरणांची नोंद घेतली जाते व कर्ज प्रकरणाची छाननी करून निधी उपलब्धतेनुसार जेष्ठतेनुसार मंजुरी प्रदान केली जाते.

शासन निर्णय – येथे पाहा क्लिक करा

आण्णाभाऊ साठे महामंडळाची अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – www.slasdc.org

Annabhau Sathe Vikas mahamandal Loan Scheme

 

Annabhau Sathe Karj Yojana

 

शासन निर्णय – येथे पाहा क्लिक करा

 

1 thought on “अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना”

  1. Pingback: SBI Mudra Loan

Leave a comment