Aabha Ayushman Health Card

AABHA AYUSHMAN HEALTH CARD VARDAN

आभा आयुष्यमान हेल्थ कार्ड नागरिकांना ठरतोय मोठे वरदान 2023

‘आभा’हेल्थ कार्ड काय आहे? ते कसे काढायचे आणि त्याचे फायदे काय? जाणून घ्या पूर्ण माहिती?

‘आभा’हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थाने नागरिकांच्या आरोग्याची कुंडलीच आहे,”असं म्हणत हे कार्ड बनवून घ्यायचं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे.

या कार्डसोबत रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवून दिली जाईल या कार्डाच्या मदतीने डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याची नोंद पाहू शकतात. म्हणजेच या कार्डाद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले आहे.

आभा हेल्थ कार्ड म्हणजे नक्की काय:

आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याची संबंधित माहिती साठवली जाईल.

हे कार्ड एक प्रकारचे आपल्या आधार कार्ड सारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून लग्नाची सगळी मेडिकल हिस्टरी डॉक्टरांना माहित होऊ शकेल.

यात कोणत्या व्यक्तीला कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषध देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेची जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डाच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाईल

तर आपण बघूया आभा कार्डाचे फायदे पुढील.

आभा कार्डद्वारे वैद्यकीय माहितीचे डिजिटल स्टोरेज व आरोग्य सेवा व्यक्तींसाठी अधिक सुलभ, सोयीस्कर आणि कार्यक्षम बनवते. हे कार्ड सरकारी आणि खाजगी दोन्ही रुग्णालयामध्ये चालते. एवढेच नाही तर कोणत्याही डॉक्टरांच्या खाजगी दवाखान्यात आहे याचा वापर करता येऊ शकतो. आभा कार्ड हेल्थ आयडी चे फायदे खालील प्रमाणे आहेत.

उपचारासाठी आरोग्य संबंधित कागदपत्रे किंवा दिलीप सोबत ठेवायची गरज भासणार नाही.

यामध्ये तुमचा आजार किंवा त्रास काय आहे. रक्तगट तसेच औषधी आणि डॉक्टर यांच्याशी संबंधित सर्व माहिती असेल

तुम्ही तुमची सर्व वैद्यकीय नोंद जसे की लॅब रिपोर्ट, आणि निदान दाखवू शकता.

ऑनलाइन उपचार टेली मेडिसिन. खाजगी डॉक्टर, ई -फार्मसी आणि वैयक्तिक आरोग्य नोंद यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.

या कार्डला विमा कंपन्याशी लिंक करण्यात आले आहे ज्यामुळे तुम्हाला विम्याचा लाभ मिळेल.

रुग्णालय, दवाखाने आणि विमा कंपन्यासह वैद्यकीय नोंद सहज शेअर करता येईल

    ABHA कार्ड कसे बनवले जाईल?

 

 

  • आयुष्यमान डिजिटल हेल्थ मिशनची वेबसाईट उघडा त्यासाठी येथे क्लिक करा
  • होम पेजवर Create Your ABHA Number यावरती क्लिक करा.
  • Abha क्रमांक तयार करण्यासाठी दोन भिन्न प्रकारचे पर्याय दिसतील, तुम्हाला सोपा वाटणारा एक निवडा.
  • आधार क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन वर क्लिक करा आणि पुढे पृष्ठावर क्रमांक प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  • तुम्हाला नोंदणी कृत मोबाईल नंबर वर एक OTP दिसेल. हे प्रविष्ट करून. तुम्ही ABHA कार्ड चा अर्ज भरता
  • अर्जात विचारलेली माहिती दिल्यानंतर ती सबमिट करा. त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करा.
  • यासाठी तुम्हाला my account वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर दिलेल्या पर्यायातून प्रोफाइल संपादित करा वर क्लिक करून तुमचा फोटो अपलोड करा.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • ABHA कार्ड तयार केले जाईल
  • ABHA कार्ड डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट करून घ्या

        आभा कार्ड साठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • शिधापत्रिका
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर

आभा कार्ड तुमच्या आरोग्य सेवेसाठी खूप लाभदायक आहे. आबा कार्डाचे फायदे आपण पाहिले आहेत. आरोग्य सेवेचा लाभ घेताना तुमची सर्व वैद्यकीय माहिती उपचारांशी संबंधित कागदपत्रे एकाच ठिकाणी करा. पेपरलेस प्रणाली आणि आरोग्य सेवा व्यावसायिकापर्यंत पोहोचल्यामुळे, आभा कार्ड हे भारतातील आरोग्य सेवेचे भविष्य ठरू शकते. त्यामुळे आजच तुमचे आभा काढा. आणि तुमची वैद्यकीय माहिती एकाच फोल्डरमध्ये साठवून ठेवा.

आभा कार्ड चे फायदे ही माहिती कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा अशा अधिक माहिती पाहण्यासाठी व ती माहिती वाचत राहण्यासाठी सर्व मराठी बांधवांना आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आजच सामील व्हा

आमच्या या ब्लॉगला आपण भेट दिल्याबद्दल धन्यवाद

 

नविन अपडेट 

 

AYUSHMAN BHARAT YOJANA ! आयुष्मान  भारत कार्ड योजना पूर्ण माहिती.

परिचय

ayushman bharat yojana आयुष्मान भारत योजना ही भारतातील गरीब आणि वंचित लोकांसाठी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना दरवर्षी ₹5 लाखांपर्यंतचे विमा कव्हर मिळते.

योजनेचे उद्दिष्ट

* गरीब आणि वंचित लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.

* आरोग्यविमा सुविधांमध्ये प्रवेश वाढवणे.

* गरीब लोकांवरील आरोग्य खर्चाचा बोजा कमी करणे.

योजनेची पात्रता

* योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

* लाभार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

* लाभार्थ्याचे नाव सामाजिक आणि आर्थिक जाती जनगणनेत (SECC) समाविष्ट असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा

* आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन करता येतो.

* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

* ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्रात संपर्क साधावा लागेल.

आवश्यक कागदपत्रे

* आधार कार्ड

* पत्ता पुरावा

* उत्पन्नाचा दाखला

* सामाजिक आणि आर्थिक जाती जनगणनेचा (SECC) प्रमाणपत्र

योजनेचे फायदे

* लाभार्थ्यांना दरवर्षी ₹5 लाखांपर्यंतचे विमा कव्हर मिळते.

* योजनेअंतर्गत 1300 पेक्षा जास्त आरोग्य सुविधांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

* योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोणतेही प्रीमियम भरावे लागत नाही.

योजनेची मर्यादा

* योजनेसाठी निश्चित केलेली पात्रता निकष पूर्ण करणारेच लाभार्थी पात्र ठरतात.

* योजनेसाठी उपलब्ध असलेला निधी मर्यादित असतो.

* योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना योजनेच्या नियमांचे आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

योजनेची अंमलबजावणी

आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाते.

योजनेशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे

* योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दरवर्षी बदलू शकते.

* योजनेची निवड प्रक्रिया आणि विमा रक्कम योजनेनुसार बदलू शकते.

* लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यापूर्वी योजनेच्या नियमांचे आणि अटींचे काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

AYUSHMAN BHARAT YOJANA
AYUSHMAN BHARAT YOJANA

 

अधिक माहितीसाठी

* तुम्ही आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

* तुम्ही तुमच्या जवळच्या  CSC जनसेवा केंद्रात संपर्क साधाऊ शकता.

* तुम्ही 14555 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकता.

टीप

* आयुष्मान भारत योजना व्यतिरिक्त, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गरीब आणि वंचित लोकांसाठी अनेक आरोग्य योजना राबवतात.

**योजनेचा लाभ घेण्यासाठी:**

2 thoughts on “Aabha Ayushman Health Card”

Leave a comment